शबनम न्यूज | पिंपरी
उद्या गणरायाचे आगमन होत आहे गणरायाच्या स्वागतासाठी उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. याच उत्साहवर्धक वातावरणात पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसन्न बाळासाहेब डांगे यांच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
या स्पर्धेत नाव नोंदणी विनामूल्य आहे. गौरी-गणपती सजावटी पूर्णपणे घरी करणे आवश्यक आहे, तसेच आयोजक सजावटीची पाहणी करण्यासाठी आपल्या घरी भेट देतील, या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रसन्न डांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आपण नाव नोंदवू शकता, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तसेच या स्पर्धेत प्रथम विजेत्यास टू व्हीलर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच दुसरे क्रमांकाचे पारितोषिक वॉशिंग मशीन व तिसरे क्रमांकाचे पारितोषिक टीव्ही देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रसन्न बाळासाहेब डांगे यांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ, गावडे भोईर आळी ,चिंचवडगाव येथे प्रसन्न डांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.