शबनम न्यूज: प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील श्री मच्छिंद्र तात्या तापकीर सोशल फाउंडेशन आयोजित रहाटणी काळेवाडी परिसरातील नागरिकांसाठी घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत अनेक भेटवस्तू बक्षीस म्हणून दिले जाणार आहे त्यामध्ये एल .ई .डी ,मोबाईल, गॅस शेगडी, मिक्सर ,पैठणी, सोन्याची नाथ, इलेक्ट्रॉनिक शेगडी, डिनर सेट, वॉटर फिल्टर इस्त्री देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या १०० विजेत्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत स्पर्धकांनी आपल्या घरी गणपतीच्या घरगुती सजावटीचा स्वतंत्र फोटो व्हिडिओ व सजावटी सोबत सेल्फी ह्या 9155808080 नंबर वर पाठवावे. स्पर्धकांनी संपूर्ण नाव व पत्ता व संपर्क क्रमांकावर पाठवावा अंतिम निर्णय आयोजकांचा असेल सजावट ही पर्यावरण (Eco friendly) असेल . स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंतिम तारीख 12 सप्टेंबर असेल अंतिम निकालाची दिनांक अगोदर कळविला जाईल. अधिक माहितीसाठी सागर मच्छिंद्र तापकीर यांच्याशी जनसंपर्क कार्यालय तापकीर नगर काळेवाडी यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेत अनेक नागरिकांनी सहभागी होऊन प्रतिसाद द्यावा