शबनम न्युज | पुणे
पुण्यात तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जखमी करण्यात आले यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे उत्तम नगर येथील जूनियर मासे आळी येथे रविवारी दिनांक आठ दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (वय 22) राहणार गुजर कॉम्प्लेक्स उत्तम नगर असे मृत्यू झालेल्या युवकाची नाव आहे तर अमित सुदाम गुजर (वय 21) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी जयदीपची आई लक्ष्मी भोंडेकर वय 42 यांनी उत्तम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित ने जयदीप ला पोते उचलायचे आहे असे सांगून घराबाहेर नेले त्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले जयदीपला तात्काळ दवाखान्यात नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर जयदीप ला उत्तम नगर पोलिसांनी अटक केली याबाबत अधिक तपास उत्तम नगर पोलीस करीत आहेत.