शबनम न्युज | मुंबई
बॉलीवूड अभिनेते मलाइका अरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना आज सकाळी 9 वाजता घडली. अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील घरातून सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचा कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अनिल अरोरा यांनी एवढे मोठे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे. अनिल अरोरा यांचा जन्म पंजाब मधील फजिल्का जिल्ह्यात झाला. पंजाबी कुटुंबातील अनिल मर्चंट नेव्ही मध्ये अधिकारी होते. त्यांनी मल्याळम ख्रिश्चन धर्मातील जॉयस पॉलीकार्प यांच्याशी लग्न केलं. त्यांना मलाईका आणि अमृता या दोन मुली आहेत. त्यांच्या आत्महत्यामुळे अरोरा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, तसेच मलाइका अरोरावर दुःखाची डोंगर कोसळले आहे.