शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा आवरून तिचा मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली.
शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर संशयित प्रियकर विनायक आवळे असे आरोपीचे नाव आहे. दोघेही दोन वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी गेल्या एक-दोन वर्षापासून विनायक सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते, मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले, याच रागातून विनायक ने शिवानी चा गळा आवरून हत्या केली. त्यानंतर मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. आरोपी प्रियकर रिक्षा चालक असून, तो फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली.