शबनम न्युज | पुणे
पुण्यातील घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
घोरपडीतील युद्ध स्मारक परिसरातून मुंढव्याकडे जाणारी वाहने केंद्रीय विद्यालय चाैक ते घोरपडी पोलीस चौकीमार्गे जातील. मुंढवा, घोरपडी रेल्वे पुलावरुन युद्धस्मारकाकडे फक्त दुचाकी, रिक्षा आणि मोटारींना प्रवेश देण्यात येणार आहे. मालवाहू वाहने, जड वाहने, तसेच पीएमपी बसला या मार्गाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. घोरपडी युद्धस्मारकाकडे येणाऱ्या जड वाहनांनी रेल्वे उड्डाणपूल (सोलापूर लोहमार्ग), बी. टी. कवडे रस्ता, सोपानबाग चौकातून सोलापूर रस्त्यावर यावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
Advertisement