महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिला डेंग्यू आजार झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकत तिने तिच्या चाहत्यांना ही माहिती शेअर केली आहे. प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून चित्रपट, वेब सिरीज आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमातून आपली भूमिका प्रामाणिकपणे साकारत आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ती सध्या आजारी असल्याची माहिती तिने दिली आहे.
तिने इंस्टाग्राम वर एक स्टोरी ठेवत फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने हातावर पट्ट्या लावलेल्या दिसत आहे. तसेच तिच्या हाताला सलाईनची सुई दिसत आहे. या फोटोला तिने छोट्याशा कॅप्शन देखील लिहिला आहे. तिने लिहिले की, “हॅलो डेंग्यू”. यावरून तिला डेंग्यू आजार झाल्याची स्पष्ट होत आहे.
प्रियदर्शनी नुकतीच ‘नवरदेव बीएससी ऍग्री’ या सिनेमात झळकली होती. तिला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचा कै. इंदिरा चिटणीस स्मृती विनोदी अभिनेत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, याचे फोटो देखील तिने इंस्टाग्राम वर शेअर केले होते.