महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील अभिनेत्री शिवाली परब लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आज लालबागचा राजाच्या चरणी जाऊन सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. आजवर प्रेक्षकांनी तिला विनोदी भूमिका साकारताना पाहिलं. पण आता ती एका गंभीर विषयावरच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
शिवाली ‘मंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या चित्रपटातील पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. मंगला असे या चित्रपटाचे नाव असून, हे चित्रपट सत्य घटनेवर आधारित आणि भयावह घटनेतून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवासा चित्रपटातून उलगडणार आहे. गणेश उत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या चरणी चित्रपटाचे पोस्टर अनावरण झाले आहे.
Advertisement