शबनम न्यूज मावळ ,प्रतिनिधी :
मागील आठवड्यात पुणे महानगर नियोजन समिती सदस्य आणि तळेगाव दाभाडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष छबुराव भेगडे यांची समाजमाध्यमावर फोटोत छेडछाड करून बदनामी केली होती. या संदर्भात भेगडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता या तक्रारीवरून नारायण मालपोटे, अतुल मराठे, किशोर सावंत, अक्षय धामणकर, भरत येवले, प्रशांत अशोकराव जांभळे यांच्यावर तळेगाव पोलीस स्टेशनंमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे .
संतोष भेगडे हे गेले १० वर्ष तळेगाव नगर परिषदेचे नगर सेवक आहेत तसेच पुणे महानगर नियोजन समिती सदस्य आहेत त्यामुळे त्यांची समाजात एक वेगळी आणि चांगली ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वरील सहा जणांनी त्यांची जाणून बुजून सामाजिक प्रतिमा खराब करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली होती. समाज माध्यमांवर माझा फोटो वापरून त्यात छेडछाड करून “ होय मी मलिदा गॅगचा सभासद ” असा मचकूर टाकून प्रथम या पोस्ट व्हायरल केल्या .. असा भेगडे यांचा आरोप होता. माझी बदनामी करणारे हे सहा जण मावळचे आमदार यांचे समर्थक असल्याचाही आरोप संतोष भेगडे यांनी केला आहे भेगडे तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत . यामागे मला बदनाम करून माझे सामाजिक, राजकीय व आर्थिक नुकसान करण्याचा हेतू स्पष्ट होत आहे असे संतोष भेगडे यांनी सांगितले
वरील सहा जणांवर तळेगाव पोलीस स्टेशनंमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे