शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 13 ते 14 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सांगवी येथे दोन अपघात व्यक्तींनी वाहन तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पिंपळे गुरव भागातील मयुरी नगरी परिसरात पहाटे चार वाजता ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडाला मास्क बांधून आलेल्या दोघांनी दिसेल त्या गाडीला लक्ष करत कोयत्याने वाहनांच्या काचांची तोडफोड केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपरी गुरव परिसर दहशत पसरली आहे. पिंपरी गुरव च्या मयुरी नगर भागात रस्त्याच्या कडेला उभा केलेल्या वाहनांना लक्ष करण्यात आलं. ही घटना आज पहाटे 4 च्या सुमारास घडली. घटनेमुळे परिसरात दहशत परस्परली आहे. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये या आधी देखील अनेकदा वाहन तोडफोडच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु, अशा घटनांवर सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहेत. याबाबत अधिक तपास सांगली पोलीस करीत आहे.