शबनम न्युज | सांगवी
पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी विश्वामध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरातील सांगवी परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी पाहत असताना तिघांवर कोयत्याने वाढ झाल्याची घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून खून करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
या घटने प्रकरणी रितेश उर्फ लाला हेमंत पाटील आणि शुभम बाबुराव नावळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सांगवी परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तयारी वेळी ही घटना घडलेली आहे. फिर्यादी आणि त्याचा चुलत भाऊ आकीब शेख, सिद्धांत भेंडे आणि गौरव भरत यलमार हे गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी बघण्यासाठी रस्त्यावर थांबले होते. तेव्हा आरोपी सिद्धेश आणि शुभम यांच्यासह इतर काही जणांनी फिर्यादी आकीब यांच्यावर धारदार क्षेत्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिघेही खाली पडल्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहे.