ताजा खबरचा दुसरा सीझन येत आहे २७ सप्टेंबर २०२४ पासून फक्त Disney+ Hotstar वर स्ट्रीमिंगला
शबनम न्यूज: प्रतिनिधी
पुणे ; चेंबूरचा चीता, वडाळ्याचा वुल्फ आणि ठाण्याचा टायगर आलेत ‘झणझणीत’ पुण्यात त्यांच्या टीमसह ‘दहाड’ मारायला! Disney+ Hotstar ची अत्यंत प्रतिक्षित मालिका ताजा खबरचा दुसरा सीझन पुन्हा एकदा रहस्य उलगडत आहे आणि प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देत आहे. ट्रेलरने आधीच सर्वांचे लक्ष वेधले असून प्रेक्षक आणखी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ट्रेलर लाँचच्या ग्रँड रिव्हिल नंतर, कारवाई हलली थेट महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती आणि संस्कृतीच्या ह्रदयात जेव्हा भुवन बाम, श्रिया पिळगांवकर आणि प्रतमेश परब यांनी पुण्याला भेट दिली.
उत्साहाने भरलेले हे तिघेही ताजा खबरच्या दुसऱ्या सीझनसाठी आशीर्वाद घेण्यासाठी पवित्र आणि पूजनीय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेले. जादू इथेच थांबली नाही. भुवन बाम यांनी आपली यात्रा पुढे चालू ठेवत पुण्यातील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियममध्ये मजा मस्ती केली.
ताजा खबरच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकता प्रचंड आहे, जी प्रेक्षकांच्या अपेक्षा पार करेल, रहस्यं उलगडेल आणि सस्पेन्स वाढवेल. पुणेकरांकडून मिळालेल्या भरभरून प्रेमाने आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, ताजा खबरचा हा पुढचा सीझन या लोकप्रिय मालिकेला यश देईल.
~ तयार व्हा हसत हसत पैसा आणि फेमच्या शोधातल्या रोमांचक प्रवासासाठी, ताजा खबरचा दुसरा सीझन बघायला फक्त Disney+ Hotstar वर २७ सप्टेंबर २०२४ पासून. ~