शबनम न्यूज | पुणे
अकरावी प्रवेशासाठी सहाव्या विशेष फेरीची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 18 ते 21 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. दिनांक 24 सप्टेंबरला महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. सहावी विषय फेरी ही शेवटची विशेष फेरी असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या आत्तापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि पाच विशेष फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सहाव्या विशेष फेरीमध्ये एटीकेटी सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू शकणार आहेत. या फेरीनंतर डेली मेरीट राऊंड सुरू होणार असून, त्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध केले जाणार आहे. दररोज गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
Advertisement