शबनम न्युज | मुंबई
बॉलीवूड अभिनेता दीपक तिजोरी यांची 17.40 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दीपक तिजोरी यांची 17 लाख रुपयांची फसवणूक केले असल्याचे उघड स्वतः अभिनेत्याने केला आहे.
निर्माता विक्रम खाखर वर दीपक तिजोरी यांचे 17 लाख रुपयांचे फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दीपक तिजोरी ने अंबोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
विक्रम खाखर यांनी लंडनमध्ये त्यांच्या ‘टिपसी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले होते. ज्यासाठी त्यांच्याकडून 17.40 लाख रुपये घेतले होते. जेव्हा मी चित्रपटाबाबत विचारले, तेव्हा निर्माता विक्रम खाखर कोरोनामुळे उशीर झाल्याचे कारण सांगायचे. चित्रपटाची शूटिंग युरोपमध्ये थांबले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही ते कारण पुढे करत राहिले तसेच टिपसीचे शूटिंग सुरू करण्याचा निर्माता चा कोणताही विचार नसल्याचे लक्षात आल्यानंतर, मी माझे पैसे परत मागितल्यानंतरही पैसे परत झाले नाही, असे अभिनेत्याने फिर्याद दिली आहे.
ही घटना 3 मार्च 2020 ते 14 मार्च दरम्यान घडली. दीपक ने 3 मार्च 2020 रोजी निर्माता च्या खातात पैसे ट्रान्सफर केले होते, दिलेल्या पैशात जीएसटीचाही समावेश आहे. निर्मात्याने आपल्या आश्वासन पूर्ण केले नाही आणि पैसे परत करण्यासही नकार दिला. या कारणामुळे दीपक तिजोरी यांची मोठी फसवणूक झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.