शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी मध्ये कोयत्याचा धाक दाखवत महिलेचा विनयभंग केला. पिंपरी येथील भीम नगर मध्ये बुधवारी (दि.१८) रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हर्ष उर्फ लड्ड्या अमर बहोत (वय १९, रा. सॅनिटरी चाळ, पिंपरी भाजी मंडई जवळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत ३५ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. २०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपल्या मुलांसह घरी होत्या. त्यावेळी संशयित बहोत हातात कोयता घेऊन त्यांच्या घरी आला. हातातील कोयता दरवाजावर मारून त्याने फिर्यादी यांच्या पतीचे नाव घेऊन ‘तू बाहेर ये,’ असे म्हणत ‘तुला आज दाखवतोच, तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांना घराबाहेर ओढत विनयभंग केला. फिर्यादी या वाचवा वाचवा असे ओरडल्याने आसपासचे नागरिक जमा झाले. त्यावेळी बहोत याने हातातील कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली. ‘माझ्या नादाला लागू नका, मी खल्लास करून टाकेल, अशी धमकी देऊन निघून गेला. याबाबत पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.