शबनम न्युज | पिंपरी
पिंपरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीला वेश्याव्यवसायास भाग पाडणाऱ्या पती आणि सासऱ्याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सावत्र सासऱ्याने ही पीडित महिलेवर अत्याचार केला. कासारवाडी येथे ८ मार्च २०२२ ते १८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
पीडित ३२ वर्षीय महिलेने या प्रकरणी शुक्रवार (दि. २०) रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पीडित महिलेचा पती व सावत्र सासर्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती आणि सावत्र सासरे यांनी फिर्यादी पीडित महिला यांना एक ॲप त्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सांगितले. त्यानंतर पीडित महिलेच्या मोबाईलवर एका ग्राहकाने संपर्क केला असता, पीडित महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी पाठविले. त्यातून मिळणाऱ्या पैशाचा स्वतःसाठी व कुटुंबासाठी खर्च केला. पीडित महिलेने त्यांना विरोध केला असता, त्यांनी तिला मारहाण केली. तसेच सावत्र सासरा यांनीही पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.