शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील सांगली परिसरामध्ये 27 चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
शहरातील आकुर्डी, निगडी आणि सांगवी परिसरामध्ये 27 वाहनांची तोडफोड करण्यात आली. आकुर्डी गुरुद्वारा येथे 15 निगडी मध्ये 5 आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना मध्यरात्री घडली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हातात दांडके घेऊन चार चाकी वाहनांची तोडफोड करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
Advertisement
पुन्हा एकदा सांगवी ,निगडी आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तडफड करण्यात आली. यापैकी चिंचवड पोलीस आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे .इतर आरोपींचा शोध सुरू आहे. याबाबत अधिक तपास सांगवी, निगडी पोलीस करीत आहेत.
Advertisement