लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
पिंपरी : रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत, देवाची आळंदी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी बांधवांकरिता ‘ शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र यांच्या वतीने फळ वाटप तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात पिंपरी चिंचवड मधील नामांकित रुग्णालय डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच सनराइज् मेडिकल फाउंडेशन सामाजिक संस्था सहभागी झाले होते.
५००० हून अधिक वारकरी बांधवांनी या आरोग्य शिबारचा लाभ गेतला व निरोगी राहण्याचा संकल्प माऊलींच्या चरणी करून आरोग्य शिबिर संपन्न झाले.
Advertisement
आरोग्य शिबिरात प्रमुख उपस्थिती – संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर वीर , डॉ.बधे , श्री संतोष कांबळे, श्री. शंतनू कांबळे
शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र राज्य प्रमुख डॉ. सतीश दत्तात्रय कांबळ उपस्थित होते.
शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र राज्य प्रमुख डॉ. सतीश दत्तात्रय कांबळ उपस्थित होते.