शबनम न्युज | पुणे
पुणे गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे उद्योग भरारी 2024 हा समारंभ उद्योग विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोरम ऑफ स्मॉल के इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे पिंपरी चिंचवड एमआयडीसी मध्ये भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधा कचरा समस्या याबाबत अध्यक्ष अभय भोर आणि उद्योजकांनी निवेदन दिले.
या निवेदनामध्ये भोसरी एमआयडीसी परिसरातील भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचा पाढा वाचला आणि उद्योग भरारी 2024 मध्ये उद्योजक घेत आहेतच परंतु महानगरपालिकेचे यामध्ये कोणतेही सहकार्य मिळत नसून उद्योग विभागातर्फे महानगरपालिकेला सूचना देऊन उद्योगांच्या समस्या दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी उदय सामंत यांनी संबंधित विभागाशी बोलून यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आणि लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी अध्यक्ष अभय भोर, उद्योजक संजय भोर, रोहित सोनवणे, अरविंद देशमुख, अमित देशमुख, खदिर पठाण, दुर्गा भोर, संगीता काळभोर ,रहिसा पठाण तसेच अनेक उद्योजक उपस्थित होते.