शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये योगदान प्रतिष्ठान व डॉ. डी. वाय. पाटील होमिओपॅथिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य चिकित्सा आणि होमिओपॅथिक वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
सदर शिबिरामध्ये 150 नागरिकांनी सहभाग नोंदवत लाभ घेतला. याप्रसंगी सर्व रुग्णांच्या उपचाराकरिता डॉ. डी. वाय पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाचे डॉ. निर्जा शिरसागर यांनी तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य नोंदवले.
Advertisement
याप्रसंगी बापू संपगावकार, भाजप उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, गतिराम भोईर, पंजाबराव मोठे,रवींद्र प्रभुणे, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी यांच्या उपस्थितीत सदर महारोग्य शिबिर संपन्न झाले.
Advertisement