शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी विधानसभा क्षेत्रातील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या सोबत लाडकी बहीण योजना,मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज,अन्नपूर्णा योजना व इतर शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी तसेच समर्थन दर्शविण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य युवती कार्यध्यक्षा निर्मला नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनात मानवी साखळी अभियान , स्वाक्षरी मोहीम अभियान व अजिंक्य संवाद याचे नियोजन युवती अध्यक्ष वर्षा जगताप यांनी केले होते.
महाविद्यालयीन विद्यार्थी मित्रांना निवडणूक प्रक्रिया व शासनाच्या शैक्षणिक व इतर योजनांची माहिती असायला हवी जेणेकरून ते स्वतः साठी व आपल्या समाजातील सदस्यांसाठी लाभ मिळवून देऊ शकतात हा त्या मागचा मुख्य उद्देश होता.आजच्या या कार्यक्रमास महिला अध्यक्षा कविता आल्हाट,कार्याध्यक्ष फझल शेख, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ,मा नगरसेवक निलेश पांढरकर, संजय औसरमल,कविता खराडे,संगीता कोकणे , उज्वला ढोरे व इतर पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.