पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२४) : मोहननगर, चिंचवड येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे जेष्ठ कारभारी अशोक रामभाऊ नामदे (वय ६७ वर्षे) यांचे रविवारी (दि.२९ सप्टेंबर) निधन झाले. त्यांच्या मागे आई, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
सोमवारी दुपारी मोरवाडी, पिंपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी मोहन नगर परिसरातील शोकाकुल नागरिक उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरातील वृत्तपत्र छायाचित्रकार यशवंत नामदे यांचे ते चुलत भाऊ होत.