शबनम न्यूज प्रतिनिधी:
साने चौक ते चिखली चौक १२५ फूट रस्ता मंजूर असून देखील प्रलंबित आहे या संदर्भात येत्या ८ दिवसात तात्काळ तोडगा न काढल्यास येत्या ८ दिवसात स्वराज्य पक्ष व स्थानिक नागरिक यांचा वतीने जनहितासाठी तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वराज्य पक्षाचे निमंत्रक विजय जरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे दिलाआहे.
स्वराज्य पक्षाच्या वतीने विजय जरे यांनी दिलेले निवेदनात नमूद केले आहे की,
साने चौक ते चिखली हा रस्ता महानगरपालिकेने १२५ फूट रस्ता मंजूर करून देखील रस्ता रुंदीकरण करण्यात आलेला नाही. हा रस्ता परिसरातील रहदारीचा मुख्य रस्ता आहे ह्या रस्त्यावर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात त्या मुळे रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते तसेच अत्यावश्यक सेवा देखील वेळेवर पोहचू शकत नाही या मुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचा ठीसाल कारभार जबाबदार आहे. मंजूर असलेला रस्ता निविदा कडून देखील राजकीय वर्चस्वासाठी प्रलंबित आहे याचा संपूर्ण त्रास हा चिखली मधील सर्व सामान्य नागरिकांना होत आहे.प्रशासन यावरती योग्य ती कारवाई करून तात्काळ रस्ता बनवणार नसेल तर परिसरातील नागरिकांसह व स्वराज्य पक्षाच्या वतीने व इतर स्थानिक पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून जो पर्यंत रस्ता होणार नाही तो पर्यंत करण्यात येईल सदरील आंदोलन हे येत्या ८ दिवसात जनहित लक्षात घेऊन करण्यात येणार असुन, या तुन होणाऱ्या वाईट प्रसंगास पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन विभाग जबाबदार राहील याची प्रशासनाने नोद घ्यावी. असे निवेदनात नमूद केले आहे.