पिंपरी : विराज जमदाडे एक्सलन्स कमोडिटी सेंटरच्या वतीने सिझन्स बँक्वेट, यमुनानगर, निगडी प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी दोन दिवसीय भव्य कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे ३०० व्यक्तींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
पृथ्वीवर निर्माण करण्यात आलेल्या विविध वस्तू, सोने – चांदी – तांबे – जस्त यांसारखे धातू, अन्नधान्य आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, क्रूड ऑईल – गॅसोलीन यांसारखे खनिजे, दागदागिने यांसारख्या मौल्यवान चिजवस्तूंमध्ये कमोडिटी मार्केटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आपण घरात बसून ऑनलाइन गुंतवणुकीचे व्यवहार करू शकतो. हे सर्व व्यवहार शासन मान्यताप्राप्त असून या व्यवहारांवर कर आकारण्यात येतात. बेरोजगार, नोकरदार आणि व्यवसायिक यांना आर्थिक कमाईची सुसंधी यापासून साधता येते, अशी माहिती विराज जमदाडे यांनी दिली.
कार्यशाळेत सोमवार, ३० सप्टेंबर रोजी याविषयी चित्रफितींच्या माध्यमातून प्राथमिक, मूलभूत मार्गदर्शन ऑनलाइन प्रात्यक्षिकांसह देण्यात आले; तसेच मंगळवार, ०१ ऑक्टोबर रोजी कमोडिटी मार्केटिंगच्या व्यवहाराविषयी सखोल मार्गदर्शन देण्यात येणार आहे, अशीही माहिती विराज जमदाडे यांनी दिली.