पिंपरी चिंचवड : ज्ञानप्रबोधिनी विद्यालय निगडी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात रामचंद्र गायकवाड ज्युनिअर कॉलेज दिघी या संघाचा 18-08अशा 10 गुणांच्या फरकाने पराभव करत सलग 9 वेळा विजेतेपद संपादन केलेले आहे. उपांत्य फेरीत भारतीय जैन संघटना कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाला एकतर्फी पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
सदर संघातील कु.ज्ञानेश्वरी लांडे, कु.आदिती दौंडकर यांनी आक्रमक चढाया करत तसेच डावा कोपरा कु. विद्या गायकवाड, उजवा कोपरा रक्षक कु. अंजली पोळ, डावा पाचवा मध्य रक्षक कु.पुजा जाधव यांनी उत्कृष्ट पकडी घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. सदर संघात सानिष्का दिवेकर, निता जाधव, नागिन बेलपाडे, हितांशी खेडेकर, ज्ञानेश्वरी लांडे , दुर्गा केंद्रे, विद्या गायकवाड, अंजली पोळ, आदिती दौंडकर,पुजा जाधव, आदिती कडुसकर, पुजा देवरे या सर्व खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंची अहमदनगर येथे होणाऱ्या शालेय विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे सर, विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्य उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.