शबनम न्युज | आकुर्डी
नवरात्र उत्सव निमित्त विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित भव्य रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या नवरात्र उत्सवात महिलांसाठी आकर्षक बक्षीस म्हणून रोज एक पैठणी जिंकण्याची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष निखिल दळवी यांनी दिली.
सदर भव्य रास दांडिया तुळजाभवानी मंदिराजवळ ,शितळा देवी मंदिर पाठीमागे, वसंतदादा पाटील व उर्दू मनपा शाळा मैदान, आकुर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे. 3 ऑक्टो. ते 12 ऑक्टोबर पर्यंत सदर भव्य रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त महिला भगिनींनी सदर भव्य रास दांडियात सहभागी व्हावे व आकर्षक बक्षीस जिंकावे असे आवाहन निखिल दळवी यांनी केले आहे.
Advertisement