स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचा मोहिमेत उत्साही सहभाग
पिंपरी,दिनांक :०२ ऑक्टोबर २०२४:यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्समध्ये स्वच्छता ही सेवा या देशव्यापी उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळीआपल्या मनोगतात आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगत,पर्यावरणाचे संतुलन व सुदृढ मानवी आरोग्यासाठी सर्वांनी कटाक्षाने स्वच्छतेच्या सवयींचा अंगीकार करायला हवा,असे आवाहन डॉ.मुंढे यांनी यावेळी केले.
महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या महादेव मंदिराच्या प्रांगणात आयोजित या स्वच्छता मोहिमेत विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात सर्व प्राध्यापक वर्ग आणि एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पुष्पराज वाघ यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.गंगाधर डुकरे यांनी केले.