स्थानिक पदाधिकारीचे एक शिष्टमंडळ यांना विश्वासात घेवून चर्चेतून मार्ग काढण्याच्या सूचना
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड येथील दारुल उलुम जामिया इनामिया काळेवाडी येथे जुना मदरसा आणि मशीदचे काही प्रमाणात नुतनिकरण करण्यात येत होते.मात्र हे बांधकाम महापालिकेने अनधिकृत बांधकाम म्हणून पाडले.पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरात मुस्लीम धार्मिक स्थळाविरुद्ध सुरु असलेल्या अन्यायकारक कारवाई बाबत शहरातील एक शिष्टमंडळाने संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांची भेट घेवून मध्यरात्री झालेल्या कार्यवाही बद्दल माहिती दिली.या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ आयुक्त शेखर सिंग यांना फ़ोन कॉल करून कार्यवाही चा आढावा घेतला.शहरातील जीर्ण झालेले जुने बांधकाम तसेच नूतनीकरण सुरू असणाऱ्या कोणत्याही धार्मिक इमारतीवर कारवाही करू नये अश्या सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी आयुक्त शेखर सिंग यांना दिल्या. तसेच स्थानिक पदाधिकारीचे एक शिष्टमंडळ यांना विश्वासात घेवून चर्चेतून मार्ग काढवा असे सांगितले.यावर आयुक्त शेखर सिंग यांनी स्थानिक शिष्टमंडळ सोबत चर्चा करण्यास सहमती दाखवली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख म्हणाले ’पिंपरी चिंचवड शहरात सुमारे दीड लाख अनधिकृत बांधकामे आहेत.परंतु कारवाई करण्यासाठी महापालिकेला केवळ मुस्लिम समाजाचा मदरसाच दिसला. बहुसंख्यांक समाजाच्या मेंदूत मुस्लीम द्वेष रुजवण्यासाठी अश्या प्रकारच्या कारवाई कायद्याला धरून फक्त मुस्लिमांवर केल्या जातात हे अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. मुस्लीम समाजाच्या विरोधात एकतर्फी कारवाई करून समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न हा शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. भाजपा-शिवसेना (शिंदे गट) व अजित पवार गटाच्या वतीने अल्पसंख्य समाजाला वारंवार त्रास दिला जात आहे.
अतिक्रमण विभागाने सदर कारवाई हि रात्री ११.३० वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत करण्यात आली.अशा प्रकारची रात्री होणारी कारवाई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण करण्याचा आदेश शासनाने काढल्याचा ढिंढोरा पिटला गेला मात्र प्रत्यक्षात निवडक बांधकामे पाडली जातात.शहर हद्दीत यापूर्वी झालेली अनेक बांधकामे जीर्ण झाल्याने त्याचे नुतनीकरण करण्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.शहरात हजारो अनधिकृत बांधकाम असताना फक्त मुस्लिम धार्मिक स्थळ लक्ष केले ही गंभीर बाब असून महापालिका अधिकारी यांच्या मागे कोणती अदृश्य शक्ती काम करत आहे याचा खुलासा होणे गरचेजे आहे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना मौलाना अब्दुल गफ्फार म्हणाले ‘शहरातील गोरगरीब नागरिकांनी कष्ट करून पै-पै जमवून आपली घरे बांधली परंतु हि बांधकामे अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम ठेवली जात आहे.१५-२० वर्षापूर्वीची सर्वसाधारण गोर गरिबांच्या बांधकामांवर आणि जीर्ण झालेली धार्मिक बांधकामे नुतनीकरण करताना त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये यासाठी प्रशासनाला विनंती करण्यात यावी हि मागणी पिंपरी चिंचवड शहरातील अल्पसंख्याक समाजातून करण्यात येत आहे.
शिष्टमंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनाही निवेदन देण्यात आले.यावेळी युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख, मौलाना अब्दुल गफ्फार शेख,मुनाफ तरसगर,शाहबुद्दीन शेख,नसीर शेख, आदिल सय्यद,शाहिद शेख,अंजर मुल्ला,जमीर सय्यद हे उपस्तीस्थ होते.