शबनम न्युज | पुणे
पुण्यात बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास धुक्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. टेक ऑफ नंतर अवघ्या पाच मिनिटातच हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना आज सकाळी साडेसात वाजता बावधान बुद्रुक परिसरात घडली. धुक्यामुळे हा अपघात झाला ची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यातील ऑक्सिफर्ड गोड क्लब येथील हेलिपॅड वरून हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मार्गस्थ झाले होते. हेलीपॅड पासून दीड किलोमीटर अंतरावरच असणाऱ्या बावधन परिसरामध्ये धोक्याचा अंदाज आल्याने ते कोसळले त्यामध्ये दोन पायलेट एक इंजिनियर होता. तिघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.
परमजीत राम सिंह (वय ६४) आणि गिरीश कुमार पिल्लाई (वय ५३) अशी मृत्यू पावलेल्या दोन कॅप्टन ची नावे आहेत तर प्रीतमचंद भारद्वाज (वय ५६) असे त्या इंजिनियर चे नाव आहे.