चिंचवड मतदार संघाच्या अनेक समस्यांवर झळकवले फ्लेक्स !
शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील अनेक समस्यांबाबत भाऊसाहेब भोईर यांच्या वतीने संपूर्ण मतदारसंघात फ्लेक्स झळकविण्यात आले आहे.
भाऊसाहेब भोईर चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी सक्षम यंत्रणा राबवित असून, चिंचवड विधानसभा मतदारसंघात असलेल्या समस्या या सुटल्याच पाहिजे, मागील पंधरा वर्षात या मतदारसंघातील समस्या जैसे थे. आहेत. या संदर्भात फ्लेक्स द्वारे समस्या मांडण्यात आल्या आहेत.
संपूर्ण मतदारसंघात ‘लढाई परिवर्तनाची, विकासाच्या निर्धाराची’ अशी टॅग लाईन वापरून झळकवलेल्या फ्लेक्स वर ‘कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाची?’, ‘वाहतूक कोंडीत अडकून पडायचं की मोकळा श्वास घ्यायचा? ‘, ’24 तास पाणीपुरवठ्याचं काय झालं?’, ‘दडपशाही हवी की लोकशाही?’
अशा अनेक समस्या संपूर्ण मतदारसंघात ठिकठिकाणी चौकाचौकात फ्लेक्सद्वारे मांडण्यात आले आहेत. तसेच आपणही परिवर्तनाची लढाई विकासाचा निर्धार करून जिंकणार आहोत, असा आत्मविश्वास भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला आहे.
मतदारसंघात शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविणार आणि जिंकणार, असा आत्मविश्वास आयोजित पत्रकार परिषदेत केल्यानंतर आज 2 तारखेला त्यांचा महानिर्धार मेळावा संपन्न होत आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वच पक्षातील उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवित आहेत. परंतु, या सर्वांनाच मागे टाकून भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.
पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते? हे अजून कोणत्याही पक्षाच्या वतीने निश्चित करण्यात आले नाही. भाऊसाहेब भोईर हे अपक्ष निवडणूक लढविणार याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत.
आपण प्रचारादरम्यान मागील चार-पाच महिन्यात एक लाख मतदारांपर्यंत पोहोचलो असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी दोन दिवसापूर्वीच सांगितले आहे.
नागरिकांच्या मूलभूत गरजा, शैक्षणिक, सामाजिक, रोजगार युवकांचे समस्या अशा अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे सक्षम यंत्रणा आहेत, जर आपल्याला मतदारांनी संधी दिली तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्व समस्या सोडवल्या जातील, असे भाऊ साहेब भोईर यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.