शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात पिंपळे गुरव मध्ये बैल पोळा उत्साहानिमित्त बैलपोळ्याची मिरवणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे , मा. नगरसेवक नवनाथ जगताप, उपाध्यक्ष तानाजी जवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी युवा नेते अमर आदियाल, युवा नेते धनंजय ढोरे, गणेश बँक संजय जगताप,शांताराम जगताप , किसन जगताप , हनुमंत जगताप ,नरेश जगताप ,दत्तात्रय जगताप , जनार्दन जगताप ,रोहिदास जगताप ,आदेश जगताप ,दिग्विजय जगताप ,अक्षय जगताप , सुमित जगताप, कमलेश जगताप, सिद्धू जगताप यावेळी उपस्थित होते.
जगताप पाटील परिवाराची ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली असून बैलांना सजून गावातील वेशीतून संपूर्ण मंदिरांमध्ये बैलांना देवदर्शन साठी नेले जातं. बैलाच्या मिरवणुकीसाठी प्रसिद्ध अमर ब्रास बँड लावून मिरवणूक काढण्यात येत असते, त्यामध्ये ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये बैलांचा दर्शन घेऊन पुढील मार्गस्थ म्हस्कोबा मंदिर श्री महालक्ष्मी मंदिर श्री मारुती मंदिर श्री बापूजी बुवा मंदिर श्री गणेश मंदिर श्री तुळजाभवानी मंदिर अशाप्रकारे गावातील मंदिरात बैल जोडीला देवदर्शनासाठी नेले जाते. व गावातील ग्रामस्थ बैलाला औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला जातो.
यामध्ये पिंपळे गुरव मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यामध्ये कदम, काशिद ,देवकर, नवले, जवळकर , गांगरर्डे, जांभुळकर , साळुंके ,पाटणे, चव्हाण, जाधव ,कोतवाल, मोटे , डोळस व इतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने बैलांची पूजन करण्यात येते व शेवट जगताप परिवाराच्या घरातील सदस्य व श्री शाम भाऊ जगताप मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित असतो, बैलांचे पूजन करून बैलपोळा संपन्न होत असतं.