शबनम न्युज | पिंपरी
भारतीय स्वातंत्र्य संक्रमणातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कार्य व योगदान केवळ भारत देशासाठी नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रसिद्धी माध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली होती, यामध्ये अक्षम्य चूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.
निवेदनाद्वारे त्यांनी म्हटले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याबाबत प्रसिद्धी माध्यमांना प्रसिद्धी पत्रकार द्वारे मनपाच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत ईमेल द्वारे ही माहिती देण्यात आली, यामध्ये अक्षम्य चूक केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर विभागाने “राष्ट्रपिता महात्मा गांधी” असा नामोल्लेख न करता फक्त महात्मा गांधी नामोल्लेख केलेला दिसतो. महापुरुष व राष्ट्रपुरुष यांचा आदर व सन्मान राखण्याकरिता त्यांचा नामोल्लेख योग्य प्रकारे, त्यांचा आदर आणि सन्मान वाढेल या पध्दतीने केला जातो. ही बाब आपल्या माहिती व जनसंपर्क विभाग व संबधित अधिकारी, कर्मचा-यांना ठाऊक नाही का ? किंवा त्यांच्याकडून जाणिवपूर्वक महापुरुषांचा अवमान व अहवेलना करणेचा प्रयत्न होत आहे का ?
माहिती व जनसंपर्क विभागाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत झालेली ही चूक दुर्लक्षित करून चालणार नाही. सदर बाब राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर प्रेम करणा-या सर्वांच्या भावना दुखावणारी देखील आहे. तरी याबाबतीत संबधितांवर योग्य ती कारवाई करून त्यांना योग्य समज द्यावी, अन्यथा “सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह” या मार्गाने ही आपल्याविरुध्द आंदोलन करू, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.