पिंपरी चिंचवड प्रतिनिधी;
केंद्र सरकार वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. शिवसेना नेते तथा कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना चे अध्यक्ष सुरज बाबर यांनी याबाबत केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले आहे.
विशेषत: स्वर्गीय खासदार गजानन बाबर यांनी मागील दहा वर्षापासून याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता त्यानंतर त्यांचे चिरंजीव सुरज बाबर यांनी सतत पाठपुरावा केल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.
याबाबत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना नमूद केले की,
सर्वप्रथम मी केंद्र सरकारचे आभार मानतो , वर्ष 2013 पासून याचा पाठपुरावा चालू आहे परंतु 2024 ला उशिरा का होईना या सरकारला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत जाग आली .
आम्ही मा स्वर्गीय खासदार गजानन बाबर तसेच मी स्वतः, मा महामहिम, आदरनीय द्रौपदी मुर्मू मॅडम,
राष्ट्रपती,भारत सरकार.मा ना श्री नरेंद्रभाई मोदी साहेब,पंतप्रधान, भारत सरकार . व,मा संस्कृति मंत्रालय,भारत सरकार यांना २०२२-२३ पासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत.
वर्ष २०१३ पासून याबाबत प्रयत्न सुरु असून राज्य शासनाने साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात मराठी भाषेला २००० वर्षांचा इतिहास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मराठी भाषा प्राचीन असून या भाषेत सतत श्रेष्ठ दर्जाची वाङ्मय निर्मिती होत राहिली आहे. अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकषही मराठी भाषा पूर्ण करीत असल्याचे त्यांनी सांगितले .
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. मराठी
भाषा प्राचीन आणि तिचे साहित्य श्रेष्ठ आहे. मराठी भाषेचे वय जवळपास २००० वर्ष आहे
मराठी भाषेला स्वतःचे स्वयंभूपण आहे व तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम आहे .
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून केला जातो.
यापुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्री माननीय नामदार श्री सुभाषजी देसाई साहेब यांच्याकडून मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत प्रयत्न केले गेले तसेच त्यावेळेस राज्यातील साहित्यिक, कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राष्ट्रपतींना पोस्ट कार्ड लिहिली आहेत. जनतेनी लिहिलेली लाखो पोस्टकार्ड राष्ट्रपतींना पाठविण्यात आली होती.मी या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे याबाबत आभार मानतो.
या शब्दात सुरज गजानन बाबर यांनी केंद्र सरकारचे तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार व्यक्त केले आहे.