शबनम न्यूज, प्रतिनिधी:
हडपसर विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदार संघ आहे या मतदारसंघात मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले मुस्लिम उमेदवार संख्या जास्त आहे याच मतदारसंघातून महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स चे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
आपण हडपसर विधानसभा मतदारसंघ लढविणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास त्यांनी दर्शविला आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाली नाही या मतदारसंघात अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी आपण या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याचे हाजी जुबेर मेमन यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स या आपल्या संस्थेअंतर्गत हाजी जुबेर मेमन हे पूर्वीपासूनच या मतदारसंघात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
या मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचे काम या महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने करण्यात येत आहे आपण या मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत असावे अशी अनेकांची इच्छा आहे त्यामुळे आपण ही विधानसभा निवडणूक लढविणार यावर जुबेर मेमन हे ठाम आहेत.
महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारे एक कॉल प्रॉब्लेम सॉल या अभियाना अंतर्गत हाजी जुबेर मेमन यांनी या मतदारसंघातील अनेक गरीब गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. सावकारांच्या कर्जात बुडालेले व अन्याय सहन करणारे कुटुंब यांना कर्जातून मुक्ती देण्याचे काम असो किंवा वीज दरवाढीने त्रस्त असलेल्या कुटुंबांची समस्येचे निराकरण असो असे अनेक अनेक कामे या महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या अंतर्गत हाजी जुबेर मेमन यांच्या मार्गदर्शनात होत आहे. संपूर्ण हडपसर मतदार संघात हाजी जुबेर मेमन यांची एक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
हडपसर मतदार संघात मुस्लिम मतदार 33.4% आहे पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव जागा आहे जिथे मुस्लिम उमेदवार
जिंकणारच अशी परिस्थिती आहे.
सध्या मी अपक्ष म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढवण्याच्या तयारीत आहे, महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाकडे हडपसर विधानसभा मतदार संघात उमेदवारी बाबत विचारणा केली असताना मुस्लिम उमेदवार देण्यास नाकारले आहे असे जुबेर मेमन यावेळी सांगितले.
आपण हडपसर विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढविणार असे हाजी जुबेर मेमन यांनी स्पष्ट केले.