आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे आयोजित ग्रुप डान्स दांडिया स्पर्धेचे उद्घाटन संपन्न, ‘नवरंग महोत्सव अंतर्गत’ : हिरव्या रंगा निमित्ताने ‘झाडे वाटप’
शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर येथे कार्यरत असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे आयोजित ग्रुप डान्स दांडिया स्पर्धेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेच्या आमदार आश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. नवरात्रीच्या नऊ रंगांच्या अनुषंगाने , प्रत्येक दिवसाच्या रंगाचे महत्त्व जाणत , सामाजिक कार्याच्या अनुषंगाने काल असलेल्या ‘हिरव्या’ रंगाच्या धर्तीवर विविध देशी वाणांच्या रोपांचे वाटप पिंपळे सौदागर , रहाटणी परिसरातील नागरिकांना करण्यात आले. या उपक्रमाबद्दल माहिती देताना , उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे की 2050 पर्यंत जगातील 66% लोकसंख्या शहरी वातावरणात राहात असेल. शहरीकरण, तसेच बदलते हवामान, हे जागतिक स्तरावर एक आव्हान आहे जे मानवाच्या आरोग्यावर आणि कल्याणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करते. निरोगी आणि चैतन्यशील समाज स्थापन करण्यासाठी, झाडे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये, विज्ञानाने हे दाखवून दिले आहे की आपल्याला अगदी गॅलरीत कुंडीमध्ये लावलेल्या झाडांचा कसा फायदा होतो. त्यामुळेच नवरात्रीच्या मुहूर्तावर हा उपक्रम आम्ही नियमित राबवत असतो.”
आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप म्हणाल्या , “स्त्रीत्वाचा जागर म्हणून , आपण सर्वजण नवरात्री उत्सव साजरा करीत असतो.सर्वत्र आदिमाया आदिशक्तीची निस्सीम आराधना होत असताना , उन्नती सोशल फाऊंडेशनने आपले वेगळेपण जपले आहे.उन्न’ती’ चा गणेशोत्सव प्रमाणे उन्नतीचा नवरात्रोत्सव देखील अभिनव आहे. धार्मिकतेला उन्नतीने दिलेली पर्यावरणाची जोड ही पर्यावरण चळवळ पुढे घेऊन जाणारी आहे.”
याप्रसंगी , आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, चेअरमन पवना सहकारी बँक श्री जयनाथ शेठ काटे, पी के स्कुल संस्थापक श्री जग्गनाथ अप्पा काटे , गुलाब मेटे,शंकर चोंधे,राजू देवतारे राजेंद्र जैस्वाल, डॉ सुभाषचंद्र पवार , रमेश वाणी, उन्नती सखी मंचच्या उपाध्यक्षा रश्मी मोरे यांच्यासह उन्नती सोशल फाऊंडेशनचे सर्व सदस्य , विठाई वाचनालयाचे सदस्य , जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि पिंपळे सौदागर मधील नागरिक , पदाधिकारी , कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.