सीएमएस शाळेत वृक्ष दत्तक चित्र प्रदर्शनाचे उदघाटन
शबनम न्यूज: प्रतिनिधी
पिंपरी : पर्यवरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी सीएमएस शाळेने राबविलेले वृक्ष दत्तक योजना खरोखरच कौतुकास्पद आहे. सीएमएस शाळेचा आदर्श सर्व शाळांनी घेऊन हा उपक्रम शहरातील सर्व शाळेने राबवला पाहिजेत.असे उदगार आमदार अण्णा बनसोडे यांनी काढले.
निगडी येथील सीएमएस हायस्कुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण आणि वृक्ष दत्तक मोहीमेचे उदघाटन समारंभात ते बोलत होते.यावेळी दत्तक काढलेलेल्या फोटोचे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती.
आमदार अण्णा बनसोडे पुढे म्हणाले कि, सीएमएस शाळा गेली 50 वर्षापासून उच्च दर्जाचे शिक्षण देवून सर्वगुण संपन्न असा विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत आहे. झाडे लावा झाडे जगवा”
हा उपक्रम आदर्शवत उपक्रम राबविणारी ही पहिलीच शाळा आहे.पर्यवारणाचे महत्व लक्षात घेऊन शहरातील सर्व शाळेत असे उपक्रम राबविले जावेत.जेणे करून विद्यार्थी आणि पालकांमध्ये पर्यावरण विषयी जनजागृती होईल.यावेळी माजी नगरसेवक निलेश पांढरकर,अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस सुधीर नायर,पी.व्ही भास्करन, खजिनदार पी अजयकुमार,उपाध्यक्ष पी श्रीनिवासन,जी करुणाकरन, प्रविजा विनीत, माध्यमिकच्या प्राचार्य बीजी गोपकुमार पिल्ले, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका चैताली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
विजयन प्रास्ताविक भाषणात म्हणाले कि, मुलांनी आपल्या दारात एक झाड लावयाचे आहे. लावलेल्या झाडाचे संगोपन करायचे. आणि त्या झाडासोबत एका वर्षाने फोटो काढून घ्यायचे. वर्षातून एकदा या काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाईल.
स्वागत बीजी गोपकुमार पिल्ले यांनी केले.
सूत्रसंचालन सजिता पिल्ले यांनी तर आभार प्रतीक्षा दळवी यांनी मानले.