शबनम न्यूज: प्रतिनिधी
पिंपरी:-पीएमपीएमएल मधील कामगारांना सातवा वेतन आयोग २०२२ पासुन आ.अमित गोरखे सर यांच्या प्रयत्नातून लागु करण्यात आलेला होता. पीएमपीएमएल कामगगारांना ६८ महिन्यांचा फरक ४ टप्यांत देणेबाबतचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला होता. सदर निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणे बाबत पीएमपीएमएलचे कामगार व कामगार संघटना आमदार महोदयाकडे सातत्याने मागणी करत होते ,त्यास अनुसरून आ.अमित गोरखे सरांनी सातव्या वेतन आयोगाचा प्रथम हप्ता देण्यासाठी पीएमपीएमएल,पुणे मनपा आयुक्त व पिं.चिं.मनपा आयुक्त यांच्या संपर्कात राहुन पुणे मनपा (६०% स्वामित्वानुसार )रु.८४.१५कोटी.
पिंपरी चिंचवड मनपा(४०% स्वामीत्वानुसार) र.रू. ५६.१० कोटी निधी दसर्यापुर्वी त्वरित पीएमपीएमएल ला वर्ग करणेबाबत दोन्ही मनपा आयुक्त यांना सांगितले होते. त्यानुसार आज पीएमपीएमएल कडे दोन्ही मनपा कडुन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.लवकरच फरकाच्या रक्कम वितरीत केली जाणार आहे.पुणे परिवहन महानगर महामंडळातील सर्व ११,००० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. फरकाची रक्कम वितरीत करणे बाबत आमदार साहेबांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पीएमपीएमएल कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन कामगार बांधवानी व कामगार संघटनानी आमदार साहेबांचे आभार मानले आहेत.