शबनम न्युज | पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे शहर विभागीय क्रीडा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयान कबड्डी (पुरुष) स्पर्धेमध्ये औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या कबड्डी संघाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच अहमदनगर, जिजामाता महाविद्यालय, भेंडा येथे होणाऱ्या आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेत कु. योगेश शिंगाटे याची पुणे शहराच्या संघामध्ये निवड करण्यात आली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण आंधळे सर, उपप्राचार्य डॉक्टर प्रभंजन चव्हाण सर, आय. क्यू. ए.सी संचालक डॉक्टर सविता पाटील मॅडम, तसेच शारीरिक शिक्षण संचालक प्रा.सौरभ कदम सर, व इतर सर्व विभाग प्रमुख व सहकारी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
पुणे शहर विभागीय क्रीडा समितीच्या वतीने सर्व खेळाडूंचा सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी या महाविद्यालयाच्या कबड्डी संघातील योगेश शिंगाटे याची आंतर विभागीय कबड्डी स्पर्धा पुणे शहराच्या संघामध्ये निवड देखील झाली आहे. सदर स्पर्धा जिजामाता महाविद्यालय, भेंडा अहमदनगर येथे होणार असून प्रा. सौरभ कदम यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे.