शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महापालिकेत कंत्राटी पध्दतीने काम कऱणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्याच्या वेतन फरकाची रक्कम दिवाळीपूर्वीच म्हणजे २४ नोव्हेंबर पर्यंत देण्याचे लेखी आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिले. हजारावर कामगारांना त्याचा लाभ होणार आहे. दरम्यान, वारंवार मागणी करूनही मागण्यांची पूर्तता होत नसल्याने माजी स्थायी समिती अध्यक्षा सिमाताई सावळे यांनी महापालिका भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील सर्व कामगारांसह पायऱ्यांवर बसून एक तास जोरदार धरणे आंदोलन केले. प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेतली आणि सविस्तर चर्चा करून सर्व मागण्या मान्य केल्या. कामगारांना जल्लोषात त्याचे स्वागत केले.
महानगरपालिकेतील कचरा गोळा करणारे कामगार, वाहन चालक, रस्ते गटार नाले सफाई कमागार आणि अति घाणीत व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांना थकीत भविष्य निर्वाह निधी व किमान वेतनातील फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी सिमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी लेखी निवदेनाद्वारे केली होती. कामागारांच्या मागणीची प्रशासन दखल घेत नसल्याने हा प्रकार म्हणजे अत्यंत अन्यायकारक व बेकायदेशीर आहे तसेच गोरगरीब कष्टकरी कामगारांची अवहेलना असल्याची टीका त्यांनी केली होती.
वारंवार मागणी करूनही पूर्तता होत नसल्याने प्रसंगी काम बंदचा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, या विषयावर अतिरिक्त आयुक्त यांच्या कक्षात कामगार प्रतिनिधींसह सिमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी चर्चा केली. अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आणि सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांच्या बरोबर तासभर सांगोपांग चर्चा झाली. त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आणि १६ ऑक्टोंबर पर्यंत सर्व हिशेब देण्यात येईल आणि २४ ऑक्टोंबर पर्यंत कार्यवाही होईल, असे लेखी पत्र दिले. प्रशासनाच्या पत्रानुसार जानेवारी २०११ ते मार्च २०१५ या कालावधीतील भविष्य निर्वाहन निधी (पीएफ) आणि त्याचे फरकाबाबत अ, फ आणि ड कार्यालयाला सुचना देण्यात आली असून आहे. कार्यवाही पूर्तता करून लवकरात लवकर रक्कम देण्यात येईल, असे म्हटले आहे.