शबनम न्युज | मुंबई
मुंबईतील वांद्रे येथे शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे भागात बाबा सिद्दिकी यांच्यावर 9 mm पिस्तूलने सहा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.
बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर दसऱ्याच्या निमित्त फटाके वाजवण्यात येत होते. याचवेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. रात्री ९ : १५ ते ९ : २० च्या सुमारास हा हल्ला झाला. रात्री साडे अकराच्या सुमारास बाबा सिद्दिकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झिशान सिद्धीकी आणि सिद्दिकी कुटुंबाची भेट घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक हल्लेखोर अद्यापही फरार आहे. आरोपी कर्नल सिंह आणि धर्मराज कश्यपची पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्या हल्लेखोरांपैकी एक उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.