शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी येथील मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आयोजित भव्य रावण दहन व मनोरंजनाच्या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनमुरादआनंद लुटला. विजयादशमी सणाचे औचित्य साधून पिंपरी येथील संदीप वाघेरे युवा मंच वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य रावण व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नव महाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानामध्ये सायंकाळी सहा वाजलेपासून करण्यात आले होते या कार्यक्रमास पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, रिपाई नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, निलेश पांढरकर, सिद्धेश्वर बारणे, कुणाल लांडगे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत घुले,मा.नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, मांअतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, किशोर शिंदे, अमित लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पिंपरी चिंचवड शहराच्या औद्योगिक क्षेत्राचे भाग्यविधाते स्वर्गीय रतन टाटा यांना उपस्थित हजारो नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
आमदार अण्णा बनसोडे, अमित गोरखे, गौतम चाबुकस्वार यांच्यावतीने माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने प्रभागामध्ये होत असलेल्या वर्षभरातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना वाघेरे म्हणाले की गेल्या अनेक वर्ष असून आपण अशा प्रकारचे विविध सांस्कृतिक उपक्रम आपल्या व आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून राबवत आहोत व आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम करत आहोत. ही आपली संस्कृती आपण टिकवली तरच उद्याच्या येणाऱ्या पिढीला या लहान मुलांना आपली संस्कृती काय होती हे समजणार आहे…आणि म्हणून समाजातला रावण नष्ट होण्यासाठी,आपल्या पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी
आणि पर्यायी देशाच्या विकासासाठी आपण आपल्या संस्कृतीचे जतन करायला पाहिजे… समाजातल्या महिलांना सन्मान दिला पाहिजे.रावण विद्वान होता, रावण सर्वश्रेष्ठ होता, रावणा कडे सगळ्या गोष्टीची सुबत्ता होती, परंतु रावणाच्या आयुष्यात त्यानी सगळ्यात महत्त्वाची एक चूक केली आणि ती म्हणजे एका स्त्रीचा सन्मान राखता आला नाही.आणि त्याची एक चूक ही त्याचं पूर्ण साम्राज्य संपवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.
याचाच अर्थ असा की तुम्ही तुमच्या आयुष्यात हजारो चांगल्या गोष्टी करा, परंतु तुमच्याकडून एक चूक होते, त्यावेळेस तुमच्या आयुष्याचा रावण होतो. त्यामुळे या कार्यक्रमामधून आपल्याला हेच शिकायचे की ज्या पद्धतीने आपण या मागच्या नऊ दिवसांमध्ये देवीचा सन्मान करत होतो, अगदी त्याच पद्धतीने बाकीच्या काळात सुद्धा आपल्याला आपल्या घरातल्या आईचा, आपल्या पत्नीचा, आपल्या मुलीचा, आपल्या समाजातल्या भगिनीचा, आपल्याला सन्मान करता यायला पाहिजे..
तरच खऱ्या अर्थाने रामराज्य येऊ शकते.
कार्यक्रमाचे नियजन युवा मंच चे अध्यक्ष हरिष वाघेरे, रुपेश वाघेरे, अक्षय नाणेकर, कुणाल सातव, नितीन गव्हाणे यांनी केले तर सूत्रसंचालन शेखर अहिरराव यांनी केले.