अभिनेता अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता, त्यातूनही ते बाहेर आले होते, त्यांच्या जिद्दीचं कौतुक झालं होतं. आज त्याची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या मागे त्याची आई, पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे.
नाटक, सिनेमा, चित्रपट या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका अतुलने साकारली आणि पु.ल. देशपांडे यांनी ती पाहिली आणि अतुलला शाबासकी दिली होती.
अतुल परचुरेने त्याच्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर रंगभूमी, छोटा पडदा, मालिका विश्व सगळंच गाजवलं. परचुरे यांना कर्करोग झाला होता. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला.