शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मोरेश्वर भोंडवे यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी मोरेश्वर भोंडवे तयारी करत आहेत. त्यांनी मागील काही दिवसापूर्वी आपल्या समर्थक नगरसेवकांचं पत्रकार परिषद घेत चिंचवड विधानसभा मतदारसंघ जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाला नाही तर आपण वेगळा निर्णय घेऊ, अशी ठाम भूमिका घेतली होती.
सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे आमदार अश्विनी जगताप यांचे वर्चस्व आहे. तसेच अश्विनी जगताप यांनी कालच पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केल्याने शंकर जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उमेदवारी मिळणार नाही असे असताना एक वेगळा निर्णय घेण्याची घोषणा मोरेश्वर भोंडवे यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
त्यांना महाविकास आघाडी वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या एक-दोन दिवसातच महाविकास आघाडी वतीने उमेदवार जाहीर करण्यात येतील, यात मोरेश्वर भोंडवे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे बोलले जात आहे.