शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभाग वतीने शहरातील शाळांकरिता बेंच, टेबल, खुर्ची खरेदीसाठी विशिष्ट ठेकेदारांना फायदा होईल, या हेतूने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ती त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने शहरातील महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची, बेंच (बाक ) तसेच शाळेतील फर्निचर खरेदी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभाग यांच्या वतीने दिनांक २७.०९.२०२४ ते ०९.१०.२०२४ या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सदर निवीदा ही शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या २ ठेकेदार यांना लाभ मिळावा ह्या हेतूने त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे उपलब्ध असणारे प्रमाणपत्र , कागदपत्र , तसेच शॉप ॲक्ट मध्ये फर्निचर चा उल्लेख असावा अशा अटी तसेच खालील काही मुद्दे यांची अट ठेवण्यात आली आहे.
1. past 7 years experience compulsory
2. OEM Authorized reseller compulsory
3. BIFMA level 3 certificate compulsory
वरील अटी शर्ती मुळे सदर निविदा प्रक्रिया पारदर्शकपणें राबविण्यात येत नसल्याची तक्रार अनेक ठेकेदार तसेच यात सहभागी होऊ इच्छित असणारे उद्योजक यांनी व्यक्त केली आहे. तरी सदर निविदा प्रक्रिया मध्ये शहरातील इतर अनेक ठेकेदार सहभागी व्हावे म्हणुन सदर निविदा प्रक्रिया मधील अटी शर्ती सर्वसमावेशक करण्यात याव्यात तसेच सदर निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यावतीने यापूर्वी कोरोना काळात शालेय विद्यार्थी यांना टेबल खुर्च्या पुरवठा करणाऱ्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती त्यात टेंडर प्रक्रियेत निकृष्ट दर्जाचे तसेच निविदा तपशील नुसार अयोग्य वस्तू पुरवठा करणाऱ्या ठेकेदार याला पुन्हा काम मिळावे ह्या हेतूने भांडार आणि शिक्षण विभाग यातील अधिकारी यांनी सदर निविदा प्रक्रिया मधील अटी शर्ती तयार करून रिंग तयार केली आहे तरी सदर निविदा तयार करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभाग आणि शिक्षण विभाग यातील अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. तसेच कोरोना काळात पुरवठा करणाऱ्या त्या ठेकेदार यांच्या कामाची चौकशी करून त्याला ब्लॅक लिस्ट करून या निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये असे संबंधीत अधिकारी यांना आदेश देण्यात यावे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने शालेय विद्यार्थी यांना बाक , टेबल खुर्ची आणि फर्निचर खरेदी करिता दिनांक २७.०९.२०२४ ते ०९.१०.२०२४ या कालावधीत जी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदर निविदा ही विशिष्ठ ठेकेदार यांना लाभ मिळावा या पद्धतीने निविदा प्रक्रिया तयार केली असल्याने सदर निविदा रद्द करून शहरातील उद्योजक यांना भाग घेता येईल अशा अटी शर्ती टाकण्यात येवून निविदेत स्पर्धा निर्माण करावी जेणे करून अनेक ठेकेदार सहभागी होऊन वस्तूचा दर्जा तसेच दरात स्पर्धा तयार होऊन ठराविक महानगरपालिकेचे पैसे वाचून विशिष्ट ठेकेदार यांना लाभ मिळणार नाही. याकरिता निविदा प्रक्रिया मधील अटी शर्ती रद्द करून नवीन योग्य आणि सर्वसमावेशक अटी शर्ती टाकण्यात येवून पारदर्शक निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून आपणांस करण्यात येत आहे. सदर निवेदन विचार करून त्वरित योग्य कारवाई करण्यात यावी, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.