शबनम न्युज | पुणे
पुणे शहराचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक सेलचे पुणे शहर अध्यक्ष जुबेर बाबू शेख यांची पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदी निवड झाली आहे.
जुबेर बाबू शेख हे राष्ट्रवादी पक्षाचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात. सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी जुबेर बाबू शेख यांच्यावर पक्षाने दिली आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारी मुळे आपला मोठा आत्मविश्वास वाढला आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून सर्व उमेदवार हे आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील, यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहोत. तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी, यासाठी मी पक्षाचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया जुबेर बाबू शेख यांनी निवड झाल्यानंतर दिली. त्यांच्या निवडीनंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.