– समाविष्ट गावांमध्ये महायुतीचा झंझावाती प्रचार
– आपुलकीच्या गाठीभेटींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्यूज | पिंपरी
चिखली- तळवडे परिसरातील सर्वात जटील शास्तीकराचा प्रश्न आमदार महेश लांडगे यांनी कायमस्वरुपी सोडविला. सर्वसामान्य नागरिकांवर लादलेले कोट्यवधी रुपये माफ केले. आघाडी सरकारने लावलेले शास्तीकराचे भूत मानगुटीवरून उतरविणाऱ्या आमदार लांडगे यांनाच यावेळी पुन्हा आमदार करणार आहोत, असा निर्धार चिखली-तळवडेतील ग्रामस्थांनी केला आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-एनसीपी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या आपुलकीच्या गाठीभेटींना चिखली, मोरेवस्ती, पाटीलनगर परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी नगरसेवक, महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, सोसायटीधारक आणि कार्यकर्ते या फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चिखलीतील साने चौकातून आपुलकीच्या गाठीभेटींना सुरुवात झाली. मोरेवस्ती, टॉवर लाइन, म्हेत्रे वस्ती, साने कॉलनी, नायर कॉलनी यासह परिसरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांच्या आमदार महेश लांडगे यांनी आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. ठिकठिकाणी महिलांनी आमदार लांडगे यांचे औक्षण केले. महिला, युवक, युवती, जेष्ठ सर्वांनी मोठ्या उत्साहाने आमदार लांडगे यांचे स्वागत केले.
चिखली परिसरात सर्वात जटील प्रश्न शास्तीकराचा होता. घरांना मिळकतकरापेक्षा तिप्पट शास्तीकर लागला होता. त्यामुळे आर्थिक बोजा पडत होता. हा दंड भरल्याशिवाय मूळ मालमत्ताकरही भरून घेतला जात नव्हता. त्यामुळे कराची थकबाकी वाढत होती. आमदार महेश लांडगे यांनी सतत पाठपुरावा करून शास्तीकर माफ केला. शास्तीकराचे भूत मानगुटीवरून उतरविले. कोट्यवधी रुपयांचा शास्तीकर माफ केला. त्यामुळे आमदार लांडगे यांच्याप्रती परिसरात सकारात्मक वातावरण आहे.
विकास आराखडा (डीपी) मधील तीन रस्त्यांचे काम पूर्ण केले. तीन रस्त्यांचे काम सुरू आहे. यामुळे चिखलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. चिखलीतील वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध केले. जवळच जलशुद्धीकरण केंद्र झाल्याने पाण्याची समस्या सुटली आहे. चिखलीला कचरा कोंडीमुक्त केले. त्यामुळे आम्ही आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. चिखलीतून सर्वाधिक मताधिक्य आमदार लांडगे यांना देणार असल्याची ग्वाही चिखलीकरांनी दिली.
**
प्रतिक्रिया :
भारतातील पहिले संतपीठ चिखलीमध्ये उभारण्यात आले. समाविष्ट गावांमध्येच संविधान भवन, आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, आयआयएम कॅम्पस उभारण्यात येत आहे. या पुढील काळात राष्ट्रीय कला अकादमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास प्रशिक्षिण केंद्र उभारण्याबाबत आम्ही पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे शहराची वाटचाल ‘एज्युकेशन हब’ म्हणून होईल, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार, भाजपा महायुती.