शिवाजीनगर मतदार संघ | शबनम न्यूज
पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढविणारे मनीष आनंद यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळत आहे. मनीष आनंद यांचा प्रचार दौरा औंध गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रचार दौरादरम्यान गावातील मतदारांनी मनीष आनंद यांना पाठिंबा दर्शविला , यावेळी प्रतिक्रिया देताना मनीष आनंद यांनी सांगितले की मतदार संघात परिवर्तन होणे आवश्यक आहे माझ्या या उमेदवारी मुळे मतदार संघात परिवर्तनाची नवी सुरुवात होत आहे.
जनतेशी संवाद साधत सकारात्मक बदलासाठी व विजयासाठी पाठिंबा मिळवण्याचा हा प्रयत्न आहे.
Advertisement
‘हॉकी आणि बॉल’ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मनीष आनंद यांच्या वतीने जनतेला करण्यात आले