शबनम न्यूज: प्रतिनिधी
पुणे : स्वातंत्र्या नंतर च्या काळात पहिल्यांदाच कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाने महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाच्या राजकीय नेत्यांशी ख्रिस्ती समाजाच्या हितार्थ वाटाघाटी केल्या आहेत.
राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या विचाधारा घेऊन चालणाऱ्या ख्रिस्ती समाजाला प्रत्येक पक्षाने निवडणूकीच्या काळात मतदानासाठी वापरुन घेतले. परंतु महाराष्ट्रात पसरलेल्या पन्नास लाख ख्रिस्ती मतदारांना कधीही कोणत्याही पक्षाने राजकीय पदापर्यंत किंवा पक्षातील मोठ्या पदापर्यंत येऊ दिले नाही.
किंबहुना समाजाच्या धार्मिक पुढाऱ्यांनी सुद्धा समाजाला राजकीय कार्याकडे वळण्यापासुन परावृत्त करण्याचे कार्य केले, त्यामुळे हा समाज राजकीय बाबतीत मागासलेलाच राहिला.
परंतु आत्ताच्या काळातील राजकीय विचारांच्या ख्रिस्ती नेत्यांना आपल्या पुढील पिढीची काळजी वाटत असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन ह्या विषयावर मंथन सुरु केले व त्याचाच परिणाम म्हणून एखाद्या राजकीय पक्षाला पुढे येऊन ह्या ख्रिस्ती नेत्यांशी बोलणे करावे लागले, वाटाघाटी कराव्या लागल्यात.
मागील आठवडय़ात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील ख्रिस्ती प्रतिनिधिंनी प्रा. विजय बारसे यांच्या नेतृत्वाखाली सदर मंथन व मा. नानाभाऊ पटोले यांच्या सोबत वाटाघाटी ची चर्चा करण्याकरता एकत्र येऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष माननीय. नानाभाऊ पटोले ह्यांचे सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली व चर्चे अंती पुढील मागण्यांवर सहमती होऊन महाराष्ट्र ख्रिस्ती समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले.
1) समाजातील योग्य व्यक्तींना विधानसभा व विधानपरिषदेवर नियुक्त करणे.
2) समाजातील योग्य व्यक्तींना शासन अंतर्गत वेगवेगळ्या बोर्ड वर नियुक्त्या देणे.
3) राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगावर प्रमुख पदावर नियुक्ती करणे.
4) समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नती साठी “पंडिता रमाबाई” यांचे नावाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे.
5) तिकिट वाटपाच्या वेळी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, वि.परिषद, महानगर पालिका, नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत ह्यां मध्ये वाटा मिळावा, त्याच प्रमाणे स्वीकृत सदस्य करिता प्रामुख्याने विचार करण्यात यावा.
6) पक्षा मध्ये काम करण्याकरता पदांवर नियुक्ती देऊन निरिक्षक म्हणुन संधी देण्यात यावी.
7) पक्षाच्या प्रत्येक फ्रंटल ऑर्गनायझेशन मध्ये आम्हाला वाटा देण्यात यावा.
वरील सर्व मागण्यांवर विस्तृत वाटाघाटी झाल्यानंतर हवाला मान्यता दिल्यामुळे येत्या विधान सभेच्या निवडणूकीत सर्व मताने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाने मतदान करण्याचा ठराव पास करून पुण्याला दिनांक 11 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद आयोजित करून महाराष्ट्रातील पन्नास लाख ख्रिस्ती मतदारांपर्यंत पोहचवण्यात यावे असे ठरले.