शबनम न्यूज | पुणे
द संदूर मँगनीज अँड आयर्न ओअर्स लिमिटेड (एसएमआयओआरई अथवा द कंपनी) या कंपनीने अर्जस स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर व्यावसायिक दृष्ट्या व्यूहात्मक ताबा मिळवण्याचा व्यवहार 11 नोव्हेंबर 2024 रोजी यशस्वीरित्या पूर्ण केला. द संदूर मँगनीज अँड आयर्न ओअर्स लिमिटेड कंपनी भारतात खाजगी खाण उद्योग क्षेत्रातील एक मोठी अग्रणी कंपनी आहे तर अर्जस स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाहन निर्मिती उद्योगासाठी आवश्यक उच्च गुणवत्ताधारक स्पेशल बार क्वालिटी (एसबीक्यू) पोलाद उत्पादन क्षेत्रातील माहीर कंपनी आहे. अत्यंत महत्वाचा टप्पा ठरलेल्या या व्यवहाराची घोषणा एप्रिल 2014 मध्येच प्रथम करण्यात आली होती. संदूर मँगनीज कंपनीच्या एक खाण उद्योग कंपनीच्या रुपातून एकात्मिक मेटल्स अँड मायनिंग पॉवरहाउस कंपनीमध्ये उत्क्रांत होण्याच्या प्रक्रियेत हा व्यवहार अत्यंत महत्वाचा टप्पा आहे.
- एका महत्वाच्या नोंदीनुसार, संदूर मँगनीज कंपनीने अर्जस कंपनीचे 99 टक्के भागभांडवल आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपल्या मूळ शेअर परचेस ॲग्रीमेंट (एसपीए) करारात आवश्यक सुधारणा करुन घेतली होती. आधी या करारनुसार 80 टक्के भागभांडवल खरेदीचीच तरतूद होती जी 99 टक्क्यांपर्यंत सुधारण्यात आली होती. त्यायोगे अर्जस कंपनीला आपल्या प्रचालन प्रक्रियेत पूर्णपणे सामावून घेण्यासाठी संदूर मँगनीज कंपनी कटिबद्ध आहे हे अधोरेखित होते.
- व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत व्यूहात्मक असलेला हा खरेदी व्यवहार पूर्णत्वास गेल्यामुळे अर्जस कंपनी आता संदूर मँगनीज कंपनीची उपकंपनी झाली आहे.
- या खरेदी व्यवहाराचे एंटरप्राईज व्हॅल्यू (इव्ही) मूल्य रु. 3000/- कोटी आणि भाग भांडवल अथवा इक्विटी व्हॅल्यू रु. 2000/- कोटी झाले आहे.
संदूर मँगनीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बहिर्जी ए. घोरपडे या महत्वपूर्ण व्यवहारावर भाष्य करतांना म्हणाले, खनिज उत्खनन उद्योगापासून धातू उद्योगापर्यतचा प्रवास घडवण्यातील हा व्यवहार एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. संदूर मँगनीज कंपनीमध्ये अर्जस कंपनी उत्तमरित्या मिसळेल आणि आमच्या व्यवसाय मॉडेलशी एकरुप होईल. यामुळे आमच्या कंपनीचा मेटल अँड मायनिंग पॉवरहाउस उद्योगात कायपालट होईल. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी घोषणेच्या तारखेपासून 7 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता मात्र आमच्या टीमने अविरत कार्य करुन विक्रमी वेळेत हा व्यवहार पूर्ण केला. मी अर्जस स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अध्यक्ष या नात्याने या कंपनीच्या टीमसोबत अत्यंत जवळून काम करण्यास उत्सुक आहे. ग्राहकांना गुणवत्तावान उत्पादने पुरवण्यावर लक्ष्य केंद्रीत करणार आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील कंपनीअंतर्गत विपुल संधी निर्माण करुन सर्व भागधारकांसाठी एकत्रित मूल्यवर्धन करण्यावर कंपनी आपले लक्ष केंद्रीत करणार आहे. संदूर मँगनीज कंपनीच्या भागधारकांसाठी, अर्जस कंपनी खरेदी व्यवहारातून अनेक एकत्रित उर्जा उत्सर्जित होण्याची अपेक्षा असून त्यातूनच संदूर मँगनीजच्या सद्य प्रचालनाचे अर्थपूर्ण एकात्मिकरण होणार आहे. अर्जस स्टील कंपनीकडे प्रचंड क्षमता आहे. या कंपनीच्या वाहनउद्योग क्षेत्रातील विद्यमान मूळ क्षमतांमध्येच या कंपनीची ही सर्व क्षमता विराजमान आहे. अगदी संरक्षण, रेल्वे, उर्जा, व निर्यात क्षेत्रांसाठी देखील या कंपनीची क्षमता सध्या पुरेशी आहे.
संदूर मँगनीज अँड आर्यन ओअर्स लिमिटेड विषयी:
द संदूर मँगनीज अँड आयर्न ओअर्स लिमिटेड कंपनी भारतात खाजगी खाण उद्योगात मर्चंट मायनर्स व कमोडीटी प्रोड्यूसर क्षेत्रात व्यापार करणारी एक सर्वाधिक आदरणीय कंपनी आहे. कंपनीकडे या क्षेत्रात तब्बल सात दशके व्यवसाय करण्याचा अनुभव आहे. सध्या कंपनी मायनिंग (मँगनीज अँड आयर्न ओअर्स), फेरोअलाय्झ, व कोळसा आणि उर्जा या तीन प्रमुख क्षेत्रात व्यवसाय करीत आहे. ही सर्व क्षेत्रे एकमेकांशी संलग्न असल्यामुळे कंपनीला मेटल्स व मायनिंग उद्योगातील एकात्मिक कंपनी होण्यास फायदेशीर ठरणार आहेत.