शबनम न्यूज | पुणे
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे येथे राज्यशास्त्र विभागांतर्गत 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त ” भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य जाणीव आणि जागृती ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. रोहित कांबळे इंग्रजी विभाग प्रमुख- यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेतील मूलतत्त्वाबाबत थोडक्यात विवेचन केले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक, प्रा. माणिक कसाब – प्रमुख राज्यशास्त्र विभाग यांनी” भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य जाणीव आणि जागृती ” या विषयाला न्याय देतांना भारतीय राज्यघटनेत कलम 12 ते 35 मध्ये भारतीय नागरिकांच्या विकासासाठी मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला असून अधिकाराबरोबरच कलम 51 ‘अ ‘मध्ये 42 वी घटना दुरुस्ती करून 1976 मध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. तसेच 86 वी घटनादुरुस्ती १२ डिसेंबर 2002 मध्ये करून 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले आहे.सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट असून हे सर्व कर्तव्य कसे महत्वपूर्ण आहे या संदर्भात मत व्यक्त केले तसेच संविधानातील सर्व मूलभूत कर्तव्यावर कलमवार चर्चा करून सर्व मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिकांना कशी जबाबदारीची जाणीव करून देतात या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले देत मार्गदर्शन केले.प्रत्येक भारतीय नागरिकांनी मूलभूत अधिकार उपभोगतांना मूलभूत कर्तव्यांकडे डोळे झाक न करता भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेतील स्वातंत्र्य,समता, बंधुत्व व न्याय या मूल्यांचा अंगीकार करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी, मा. श्री.मयुर मुरलीधर ढमाले, खजिनदार, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाथा मोकाटे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला प्रा. रोहित कांबळे,प्रा. सविता मानके,,प्रा. प्रभाकर गायकवाड, प्रा. महेश म्हसागर,मा. श्री. प्रवीण भावे कार्यालयीन अध्यक्ष, सौ. वर्षा ताजणे,कु. नेहा लांडगे,श्री वैभव बडवे श्री.श्रीकांत कांबळे इत्यादी विभाग प्रमुख,सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रा.डॉ. देवानंद गोरडवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. संतोष कदम यांनी मानले. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.